Top News

प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालयातर्फे नवचैतन्य देवीचा सजीव देखावा सादर


सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय संस्थेच्या वतीने शारदेय नवरात्रोत्सव निमित्त सृष्टी निर्मिता आराध्य दैवत शिवलिंग प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी प्रतीकात्मक नवचैतन्य देवीचा सजीव देखावा सादर करण्यात आला आहे, दरम्यान हा देखावा पाहण्यासाठी अबाल वृद्धांसह नागरिकांची गर्दी होत आहे.

        यावेळी शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव ,माजी जिल्हा परिषद सदस्या इंद्रायणी पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून चैतन्य नवदेवींची आरती करण्यात आली, यावेळी उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करून या उपक्रमाचे कौतुक केले.

          या समारंभास सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब माळी, दगडू माने यांच्यासह शिरोळ व परिसरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली, दररोज सायंकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत प्रतीकात्मक नवदुर्गा सजीव देखावा सादर केला जात आहे, विशेषत: महिलांची गर्दी होत असून शिव परमात्मा यांची ओळख व्हावी या उद्देशाने प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, मनीषा बहेनजी यांनी स्वागत करून सर्वांचे आभार मानले.

थोडे नवीन जरा जुने