छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी पायाखुदाई प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे उदगार
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा व त्यांच्या दैदीप्यमान इतिहासाचे दर्शन घडवणारे म्युझियम येत्या सहा महिन्यात पूर्ण केले जाईल, या संपूर्ण कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही त्यामुळे काम वेगाने पूर्ण करा अशा सूचना प्रशासनाला देताना जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा व म्युझियम व्हावे ही येथील नागरिकांची अनेक वर्षाची मागणी होती शिरोळ तालुक्याच्या जनतेने आणि जयसिंगपूर शहरवासीयांनी पाहिलेले हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, छत्रपती शिवाजी महाराजांचे हे स्मारक नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल असे उदगार माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले, जयसिंगपूर नगरपरिषदेच्या वतीने २ कोटी १९ लाख रुपये खर्चाच्या कन्स्ट्रक्शन व पुतळा उभारणीच्या कामाची सुरुवात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शुभहस्ते गुरुवारी पायाखुदाई करुन करण्यात आली यावेळी ते बोलत होते,
३५ ते ४० वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता, तत्कालीन मंत्रिमंडळाने शासनाला नाममात्र मोबदला सुद्धा न घेता जवळपास अडीच कोटी रुपयाची शासकीय जागा विना मोबदला उपलब्ध करून दिली, महाराष्ट्राच्या इतिहासात विना मोबदला शासकीय जागा मिळण्याचे अलीकडच्या काळातील हे पहिले उदाहरण असेल असे सांगताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तत्कालीन व सध्याच्या मंत्रिमंडळाचे आभार व्यक्त केले, ते म्हणाले ठेकेदारांनी या स्मारकाचे काम करताना कोणतीही तडजोड केलेली चालणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकाला साजेसे असेच काम झाले पाहिजे, येणाऱ्या ऑक्टोंबर महिन्याच्या अखेर पर्यंत महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते या कामाची पायाभरणी केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले, अर्जुन देशमुख व
माजी नगरसेवीका सौ. रेखा देशमुख या उभयंतांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली या कामाचे ठेकेदार व्हिडीको कंपनीचे मालक विक्रम गायकवाड व दिपक धनवटे यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि जयसिंगपूर नगरपरिषदेचे मुख्य प्रशासन अधिकारी तैमूर मुलांनी यांचा सत्कार केला, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, मिलिंद शिंदे, डॉ. निता माने, शिवाजी कुंभार, माजी नगरसेवक शितल गतारे, राहुल बंडगर, महेश कलकुटगी, श्रीमती प्रेमला मुरगुंडे, सागर आडगाणे, राजू आडके, युनूस डांगे, राजेंद्र झेले,रजनीकांत कांबळे यांच्यासह चंद्रकांत जाधव घुणकीकर, अशोक घोरपडे, संतोष खामकर, सर्जेराव जाधव, अभिजीत भांदीगरे, संजय चव्हाण, शंकर नाळे, अमरसिंह खाडे, सुरेश शिगांडे, भगवंत जाधव, सागर मादनाईक,सुनिल ताडे, यांच्यासह नगरपरिषद प्रशासनातील अधिकारी व जयसिंगपूर शहरातील आजी-माजी लोकप्रतिनिधी शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रशासन अधिकारी तैमूर मुलांनी यांनी मानले स्वागत व सूत्रसंचलन बबन यादव यांनी केले.
