सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
जीवनात आरोग्य संपदा महत्वाची आहे, प्रत्येकाने स्वतः बरोबर कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, शासनातर्फे आरोग्य विषयक विविध योजना राबविल्या जात आहे, मात्र एखाद्या आजाराबाबत दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन वेळीच उपाय व उपचार करून घेतले तर धोका ठरू शकतो, तेव्हा शासनाच्या अभियान अंतर्गत असणाऱ्या मोफत आरोग्य सेवा सुविधाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले,
येथील शिरोळ ग्रामीण रुग्णालय येथे बुधवारी शासनाने जाहीर केलेल्या ' माता सुरक्षित तर घर सुरक्षित' या अभियानांतर्गत आरोग्य अभियानाचा शुभारंभ नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते, यावेळी उपनगराध्यक्षा कमलाबाई शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या,
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ महेंद्र कुंभोजकर म्हणाले, माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे आरोग्य अभियान 5 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार असून अठरा वर्षावरील तरुणी, तीस वर्षावरील सर्व महिला, पाच वर्षाखालील बालके यांच्यासह गर्भवती महिलांना मोफत आरोग्य तपासणी व उपचार सुविधा मिळणार आहेत, त्यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले,
या कार्यक्रमास नगरसेविका जयश्री धर्माधिकारी, योगेश पुजारी, डॉ उमेश कळेकर, डॉ राजेश जाधव, डॉ शुभांगी सुतार, डॉ राजश्री सदलगे ,डॉ अविनाश सुतार , डॉ देवेंद्र कोरवी , प्रतीक पाटील, राजेंद्र प्रधान, पं स आरोग्य विभागाचे महाडिक उपस्थित होते, डॉ श्रीमती सरिता मगदूम यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा