Top News

हेरवाडमध्ये दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक ; तीघे जखमी

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड - तेरवाड मार्गावर असलेल्या आर.बी. पेट्रोलियम समोर दोन मोटारसायकली मध्ये झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हेरवाड येथील आर.बी. पेट्रोलियम समोर तेरवाडकडे जाणार्‍या एक्टिवा व गाडीत पेट्रोल भरून बाहेर पडणारी मोटरसायकल यांच्यात समोरासमोर अपघात झाला. या अपघातात मोटरसायकल वरील दोघांना गंभीर दुखापत झाली असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. यामधील एक मोटरसायकलधारक कुरुंदवाड येथील असल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राम ओंबासे दाखल झाले व तातडीने जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. या घटनेची माहिती मिळताच गांवचे सरपंच सुरगोंडा पाटील व  अर्जुन जाधव यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या अपघातातील जखमींवर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

थोडे नवीन जरा जुने