Top News

सत्ताधारी गटाला कपबशी तर विरोधी गटाला विमान

 हेरवाड विकास सेवा सोसायटी निवडणूक


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

गेल्या अनेक वर्षापासून बिनविरोध निवडणूक होत असलेल्या येथील हेरवाड विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणूकीसाठी १२ जागेसाठी २३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आज सहायक निबंधक प्रेमकुमार राठोड यांनी चिन्हांचे वाटप केले असून सत्ताधारी गटाला कपबशी तर विरोधी गटाला विमान हे चिन्ह मिळाले आहे.

अर्ज माघारी पर्यंत घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर अखेर या संस्थेची निवडणूक लागली. एकुण १३ जागेसाठी ही निवडणूक होणार होती पण यातील सत्ताधारी गटातील एक उमेदवार बिनविरोध झाला असून १२ जागेसाठी २३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 

आज ९ रोजी शिरोळ येथील निबंधक कार्यालयात सहाय्यक निबंधक प्रेमकुमार राठोड यांनी चिन्हांचे वाटप केले. यावेळी सत्ताधारी गटाला कपबशी तर विरोधी गटाला विमान हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे उद्यापासून निवडणूक प्रचाराला गती येणार आहे.


सत्ताधाऱ्यांचा कस लागणार...!

गेल्या अनेक वर्षांपासून बिनविरोध होत असलेल्या या संस्थेची निवडणूक लागल्यामुळे सत्ताधारी गटाला सभासदांची नाराजी दूर करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे नाराज गट मोठ्या ताकदीने या निवडणूकीत उतरला असून आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा मात्र कस लागणार आहे.

थोडे नवीन जरा जुने