Top News

श्री भैरेश्वर देवाची यात्रा 24 ते 26 एप्रिल या कालावधीत संपन्न होणार


शिरटी / शिवार न्यूज नेटवर्क :

          सालाबादप्रमाणे शिरटी ता . शिरोळ येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर देवाची यात्रा दि. 24ते 26एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे. या यात्रेनिमित्ताने देणगीकरिता रविवारी सायंकाळी भैरेश्वर युवक यात्रा कमिटी व मानकऱ्यांच्या हस्ते भैरेश्वर मंदिरात नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.

             दरवर्षी ग्रामदैवत भैरेश्वर देवाची यात्रा मोठया उत्साहात साजरी केली जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात्रा साजरी करता आली नाही. यंदा यात्रा उत्साहात साजरा करण्याचा निर्णय यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी घेतला आहे. याकरिता देणगीदारांनी सालाबादप्रमाणे देणगी देऊन सहकार्य करावे असे आवाहन यात्रा कमिटीमार्फत करण्यात आले आहे.

          यावेळी ग्रामदैवत श्री भैरेश्वराचे मानकरी तात्यासो पाटील, देवगोंडा (अमर) पाटील, अन्नासो चौगुले,अनिल रोजे, कलगोंडा पाटील, चनगोंडा पाटील ,रमेश कुंभार,प्रकाश बंडगर,बाळासो बंडगर, ग्रामपंचायत सदस्य विपुल कोगनोळे,रविराज पाटील,संजय खवाटे, रोहित ढेकळे.अमोल गुरव,आशिष उदगावे,सचिन खोबरे,निलेश सूर्यवंशी,स्वप्नील पाटील,प्रशांत ढेकळे,सागर दानोळे,चेतन चौगुले,किशोर कांबळे,नितीन माळी, ऋषभ पाटील,पै.शांतीनाथ चौगुले,जिनपाल चौगुले,सुदर्शन हुग्गे, प्रफुल्ल पाटील,अभिनंदन सूर्यवंशी,शीतल गुरव, प्रमोद ढेकळे. अक्षय गुरव रामदास भंडारे यासह भैरेश्वर युवक यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने