जागतिक महिला दिन विशेष
कोणताही राजकीय वारसा नसताना पंचायत समिती सभापतीपर्यंतची मजल मारुन तसेच शिरोळ तालुका महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांच्या हितासाठी धडपडणाऱ्या हेरवाड येथील माजी पंचायत समिती सभापती मिनाज जमादार यांचे कार्य नेहमीच समाजहिताच्या जडणघडणीसाठी मोलाचे ठरत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घेवूया त्यांच्याविषयी.....
आई-वडिल शेतकरी, अनेक अडचणींचा सामना करून घेतलेले शिक्षण आणि मिळविलेले बुध्दी कौशल्य, म्हणतात ना गरीबीची झळ सोसणार्यामध्येच परिवर्तन घडवून आणण्याची ताकद असते, अगदी याच पध्दतीने त्यांना नेहमी महिला सक्षमीकरण करून समाजातील वंचित व गरीब कष्टकरी महिलांच्या न्याय हक्कासाठी, शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करण्याची मोठी इच्छा होती, ती ईच्छा हेरवाड येथील सासरवाडीमध्ये पूर्ण झाली, त्यांचे पती युनूसअली जमादार यांनी सन २०१७ मध्ये दत्तवाड पंचायत समिती मतदार संघात त्यांना काँग्रेस या पक्षाकडून उभे करून भरगोस मतांनी निवडूण आणले. आणि या पदाच्या माध्यमातून त्यांना जनसेची सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांनी पंचायत समिती सदस्य पदाच्या माध्यमातून दत्तवाड, हेरवाड, घोसरवाडसह परिसरात विविध लाखो रुपयांची विकास कामे केली. इतकेच नव्हे तर पक्षांतर्गत ठरलेल्या सूचनेप्रमाणे त्यांना पंचायत समिती सभापती पदाची संधीही मिळाली आणि त्यांच्या यापूर्वी केलेल्या कार्याचे सोने झाले. सभापती पदाच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील सर्वच गांवांना भेटी देवून त्यांनी समस्या जाणून घेवून कार्याला सुरुवात केली, पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तालुक्यातील विविध गावात नविन अंगणवाडी, शिलाई मशिन, शेती औजारे यासह विविध शासकीय योजनांचा लाभ अगदी तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहचविला. महापुरामध्ये ही जमादार दांपत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेती विकास संस्थे मार्फत मदतीचा हात दिला. इतकेच नव्हे तर सतत धडपडणारे व्यक्तीमत्व असणारे त्यांचे पती युनूसअली जमादार यांनी तर पालकमंत्री सतेज पाटील व दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या माध्यमातून दत्तवाड पंचायत समिती मतदार संघात अनेक विकास कामे मार्गी लावली. यामध्ये दत्तवाड येथील पशुवैद्यकिय दवाखाना असो किंवा तालुक्यातील नविन अंगणवाडी असो विविध विकास कामाच्या माध्यमातून या दांपत्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेवून दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी त्यांना शिरोळ तालुका महिला काँग्रेस तालुकाध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिनाज जमादार यांना दिली. आणि त्यांनी संधीचे सोने करुन महिला काँग्रेस बळकटीकरणासाठी आजही प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत. समाजातील महिलांना सक्षमीकरण करणे, महिलांचे विविध प्रश्न जातीने लक्ष घालून सोडविणे यासह तळागाळातील महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे या उद्देशाने त्या आजही काम करीत आहेत. एक महिला काय करु शकते याचे मुर्तीमंत उदाहरण मिनाज जमादार ठरत असून इतर महिलांच्यापुढे त्यांनी आपल्या कार्यातून आदर्श निर्माण केला आहे.