Top News

महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणारी हिरकणी : मंगलताई चव्हाण

 जागतिक महिला दिन विशेष


ज महिला सक्षमीकरणासाठी सुरु असलेली जनजागृती, पोलिसांचे मार्गदर्शन, निर्भया पथकाची स्थापना, महिला समुपदेशन केंद्र यासह महिलांना न्याय मिळावा या हेतूने राबविलेली विविध योजना असूनही आज आपल्या समाजातील महिलांना न्याय मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे, पण त्यांच्या विविध समस्या जाणून घेणारी, त्यांना आपलंसं करणारी आणि त्यांना न्याय मिळवून देणारी रणरागिणी आणि बाळासाहेबांच्या विचारावर काम करणारी शिवसेनेची जिल्हा संघटीका मंगलताई चव्हाण यांना आजची हिरकणीच म्हणावे लागेल. महिला दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा...

२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण प्रत्येक जनमाणसात रुजविणारे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पगडा मंगलताई चव्हाण यांच्या डोक्यावर आला आणि त्यांनी डोळे झाकून सन १९९६ साली शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना म्हटले की अन्यायाविरोधात पेटून उठण्याची ऊर्जा या पक्षाच्या माध्यमातून मिळते, स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी बांधवासाठी केलेले कार्य हे न विसरण्यासारखे आहे. आणि याच मराठी बांधवांनी शिवसेना डोक्यावर घेतली आणि आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभला. याच शिवसेनेत जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या मंगलताई चव्हाण, तळागाळातील महिलांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने तसेच महिलांचे समुपदेशन, अनेक मोडलेले संसार सुरळीत लावून त्यांच्या आशिर्वादाचा हात आपल्या डोक्यावर ठेवून मंगलताई चव्हाण आजही कार्यरत आहेत.

जिथे महिलांच्यावर अन्याय होत असतो, तिथे मंगलताई धावून जातातच हे समीकरणच शिरोळ तालुक्यात पहायला मिळते. या सर्व कामात त्यांना साथ मिळते ती स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आणि मुख्यमंत्री उध्ववजी ठाकरे यांच्या पाठबळाची. जिल्हा पातळीवर काम करीत असताना शिवसेनेबरोबर समाजहिताची कामेही त्यांनी केलेली आहेत. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ त्यांनी तळागाळातील सर्वसामान्य लोकांना मिळवून दिलेले आहे. सध्या जिल्ह्यात अवघ्या चारच समुपदेशन केंद्रावर संपूर्ण जिल्ह्याचा भार असल्याने प्रत्येक पोलिस ठाण्यात समुपदेशन केंद्राची मागणी त्यांनी केलेली आहे, त्यामुळे प्रत्येक महिलांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी हे महत्वाचे पाऊल उचलले आहे.

महिलांना न्याय मिळवून देण्याबरोबर त्यांनी आपल्या पदाच्या माध्यमातून राज्य पातळीवर पाठपुरावा करून अनेक विकास कामांचे जाळेही त्या विणत आहेत. एक महिला काय करू शकते, याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे मंगलताई चव्हाण यांच्याकडे पहावे लागेल, त्यांनी आपल्या कार्यातून इतर महिलांच्यापुढे आदर्श निर्माण केला आहे.



थोडे नवीन जरा जुने