Top News

हेरवाडच्या अन्नपूर्णा मगदूम आदर्श गृहिणी माता पुरस्काराने सन्मानित



हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

सवित्रिच्या लेकी या मासिकेच्या वतीने दिला जाणारा आदर्श गृहिणी माता पुरस्कार हेरवाड येथील अन्नपूर्णा उर्फ अनिता काडगोंडा मगदूम यांना जेष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे व दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. 

अन्नपूर्णा मगदूम या आपल्या घरच्या व्यापातून, आपल्या दोन्ही मुलांना, चांगलं शिक्षण देऊन, आज दोन्ही मूले कागल येथे जवाहर नवोदय विद्यालय येथे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आदर्श गृहिणी माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जयसिंगपूर - नांदणी रोडलगत असलेल्या कृष्णा हॉल येथे हा शानदार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मासिकाचे संपादक संजय सुतार यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने