इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
सैनिक टाकळी (तालुका शिरोळ) येथील मावळा ग्रुप यांच्या वतीने शिवजयंती निमित्त भव्य हलगी वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सोमवार दिनांक ७ मार्च २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता हलगीवादन स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
प्रथम क्रमांक चे बक्षीस ७००१/- श्री. अनुप दादा मधाळे (नगरसेवक ,कुरुंदवाड), द्वितीय क्रमांक चे बक्षीस ५००१/- अजित पाटील (फौजी) व शुभम शिरहट्टी (फौजी), तृतीय क्रमांक चे बक्षीस ३००१/- रघुनाथ कृष्णात पाटील (प्रगतशील शेतकरी) तर सर्व चषक लोकनेते आर.आर. पाटील (आबा) प्रतिष्ठान यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. ही हलगी वादन स्पर्धा सैनिक टाकळी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल याठिकाणी संपन्न होणार आहे. कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील, नगरसेवक अनुप दादा मधाळे, महाराष्ट्र हलगी सम्राट राजू आवळे, सामाजिक कार्यकर्ते अँड. ममतेश आर. आवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.