Top News

पालकमंत्री सतेज पाटील यांचा ताफा स्वाभिमानीने अडविला


कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 शेतीपंपास दिवसा १० तास वीज द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेटटी गेल्या १३ दिवसापासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत पण महाविकास आघाडीचे सरकार दुर्लक्ष करू लागल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना हातकंणगले येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याकडून काळे झेंडे दाखवित निदर्शने करण्यात आले. 

         कोल्हापूर महावितरणच्या कार्यालयावर शेतीपंपास दिवसा १० तास वीज , अन्यायी वीज बील वसुली थांबवावे व शेतीपंपाचे चुकीची वीज बिले तातडीने दुरूस्त करावेत या मागणीसाठी २२ फेब्रुवारी पासून धरणे आंदोलनास बसले आहेत. गेल्या १३ दिवसात सरकारकडून कोणतीच विचारणा करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात धरणे आंदोलनाबरोबर , चक्का जाम , सरकारी कार्यालयात साप सोडणे यासारखे आंदोलन केल्यानंतर आज कोल्हापूरचे पालकमंत्री बंटी पाटील यांना काळे झेंडे दाखवित गाड्यांचा ताफा अडविला. 

         यावेळी पालकमंत्री बंटी पाटील घटनास्थळी भेट थांबून कार्यकत्यांचे म्हणने ऐकून घेतले व दोन दिवसात बैठक लावण्याची आश्वासन दिले.   यावेळी वैभव कांबळे,धनाजी पाटील, संपत पवार ,सुरेश शिर्के ,जबाऊल भाई, संभाजी पाटील, राहुल पाटील, राजू गिड्ड, शशिकांत जनगोंडा, अण्णा मगदूम व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने