Top News

विविध कार्यकारी सोसायटयांकडे बँकिंग क्षेत्रातील मोठ्या जबाबदाऱ्या येणार : गौतम कोतवाल

 


पुणे / शिवार न्यूज नेटवर्क :

 विविध कार्यकारी सोसायटी सेक्रेटरी व बॅक अधिकारी यांनी लेखापरीक्षणात बारकाईने लक्ष घातलं पाहीजे. वित्तीय संस्थामधे लेखापरिक्षणात अनेक त्रुटी आढळतात .म्हणूनच दोष विरहीत लेखापरीक्षण करणं ही काळाची गरज आहे. येणाऱ्या काळात केंद्र शासनाच्या अनेक योजना व बँकिंग सुविधा देण्याची जबाबदारी विविध कार्यकारी सोसायटी कडे येणार आहे. स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी सोसायटीतील कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी आधुनिकतेची कास पकडणे गरजेचे आहे. बॅंकींग क्षेत्र पुढे नेण्यासाठी जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे राबवीत असलेले लेखापरीक्षणातील उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन बॅंकींग तज्ञ गौतम कोतवाल यांनी पौड येथे केले. पौड येथे बॅंक अधिकारी व विकास सोसायटी सचिव यांचेसाठी एकदिवसीय लेखापरीक्षण दोष , दुरूस्ती कार्यशाळेत ते बोलत होते.  

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या पुढाकाराने एकदिवसीय कार्यशाळेचे पौड येथे आयोजन केले होते. यावेळी पुणे जिल्हा बॅंकेचा कर्मचारी वर्ग व विकास सोसायट्यांचे सचिव मोठ्या संखेने उपस्थित होते.

बॅंकींग क्षेत्रातील मा. गौतम कोतवाल साहेब व सी. ए. मा. जितेंद्र चौहान साहेब यांनी मार्गदर्शन केलं. दुय्यम सहाय्यक निबंघक घुले साहेब व धुमाळ साहेब यावेळी उपस्थित होते. कार्यशाळेत सचिव व अधिकारी वर्गाला येणा-या अडचणींसंदर्भात चर्चा करण्यात आली. विकास सोसायट्यांना मार्च महीन्यात भरावयाच्या करासंदर्भात सी. ए. जितेंद्र चौहान यांनी विस्तृत माहीती दिली. उपाध्यक्ष सुनील चांदेरे व अंकुश उभे यांचीही यावेळी भाषणे झाली.

बॅकेचे विभागीय अधिकारी श्री सुरेश मारणे यांनी प्रास्ताविक केलं. वसुली अधिकारी श्री राजेंद्र मारणे यांनी आभार मानले.

थोडे नवीन जरा जुने