दत्तवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
महिला दिनाचे औचित्य साधून व्याख्यान आयोजित करणेत आले होते."महिलांचे आरोग्य व बालसंगोपन" या विषयांवर मा.डॉ.सौ.अनिता पाटील यांनी मार्गदर्शन केले. उपसरपंच सौ.रूपाली पोवाडी, आदर्श माता -सौ. शारदा रंगराव धोंड,डॉ. अनिता पाटील, सौ.स्मिता कांबळे -तालुका अभियान व्यवस्थापिका पं.स. शिरोळ,कु. दिपाली संजय रेपे, कु.तेजस्विनी सुरेश चव्हाण, कु. स्नेहल लहू धोंड,कु. प्रिती रमेश चव्हाण, कु. रसिका सुभाष चव्हाण, कु. प्रज्ञा सुभाष रेळेकर, कु. प्रतिक्षा सुभाष रेळेकर,कु. सिद्धी सुभाष नलवडे, कु. ऐश्वर्या गुंडा परीट या कर्तृत्वान विद्यार्थिनीचा सत्कार करणेत आला.
महिलांचे समूहनृत्य, मनोगते, कविता सादरीकरण, संगीत खुर्ची स्पर्धा संपन्न झाल्या. उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू, गुलाबपुष्प ग्रा.पं. सदस्या- सौ.सीमा प्रमोद पाटील यांचेकडून देणेत आले. नाष्ट्याची व्यवस्था शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य -श्री.एकनाथ दत्तात्रय चव्हाण यांनी केली. स्टेज, मंडप व साउंड व्यवस्था माजी उपसरपंच श्री.दिलीप दत्तू चव्हाण यांनी केली. सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्या- सौ. सीमा प्रमोद पाटील, सौ.काशीबाई कृष्णा केंगारे, सौ. अनिता कल्लाप्पा कड़ाके,सौ.ज्योती बसगोंडा पाटील,सौ.मनिषा प्रकाश चौगुले यांचेसह पंचायत समिती शिरोळ बचत गट विभागाचे तालुका अभियान व्यवस्थापिका -स्मिता कांबळे,श्री.शरद कुलकर्णी -आर्थिक साक्षरता फेडरल बँक जयसिंगपूर, प्रभाग समन्वयक -निलेश डवरी, ज्ञानेश्वर टारफे, ब्लॉक ट्रेनर -वैशाली कांबळे, शिरोळ तालुका महिला कॉंग्रेस उपाध्यक्षा -कु. गायत्री कुरुंदवाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा -सौ.कविता पाटील,सदस्या- सौ.सारिका राणे,सौ.कोमल चव्हाण,सौ. अश्विनी चव्हाण,मुख्याध्यापक श्री. दिलीप शिरढोणे, अध्यापिका सौ.सरिता राजमाने, अंगणवाडी सेविका -सौ. रेखा चव्हाण, संगिता विभूते यांचे सह मोठया प्रमाणात महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन -मुख्याध्यापक श्री. दिलीप शिरढोणे यांनी केले. सदर कार्यक्रमास बहुमोल सहकार्य -श्री.प्रमोद पाटील,श्री.दिलीप चव्हाण यांचे लाभले.