१२ जागेसाठी २३ उमेदवार रिंगणात
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
गेल्या अनेक वर्षापासून बिनविरोध निवडणूक होत असलेल्या येथील हेरवाड विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणूकीच्या माघारीच्या अखेरच्या दिवशी ३० पैकी ७ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्यामुळे एकुण १२ जागेसाठी २३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून अखेर या संस्थेची निवडणूक लागली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून हेरवाड विकास सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध होत आहे. अर्ज माघारीसाठी २२ फेब्रुवारी ते ८ मार्च हा कालावधी होता या दरम्यान अर्ज माघारीसाठी अनेक बैठका घेण्यात आल्या यावेळी या संस्थेची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे दिसून येत होती मात्र, विरोधी गटाने माघार न घेतल्यामुळे अखेर या संस्थेची निवडणूक लागली आहे. माघारीच्या अखेरच्या दिवशी ३० पैकी ७ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्यामुळे एकुण १२ जागेसाठी २३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. उद्या ९ मार्च रोजी चिन्हांचे वाटप व २० रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर सत्ताधारी गट व विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असल्याने या सोसाटीच्या निवडणूकीचा फड चांगलाच रंगणार आहे.