Top News

पाचवा मैल येथील विठ्ठल मंदिराचा वर्धापण दिन उत्साहात


पाचवा मैल / शिवार न्यूज नेटवर्क :

महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर गेल्या पाच वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या विठ्ठल मंदिराचा वर्धापण दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून शकुंतला देवी यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. या महाप्रसादाचा लाभ परिसरातील भविकांनी घेतला. 

महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर गेल्या पाच वर्षापूर्वी विठ्ठल मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरात महाराष्ट्र - कर्नाटक राज्यातील भाविक दर्शनासाठी येतात. तसेच प्रत्येक वर्षी या मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या वर्षीही वर्धापन दिनाचे औचित्य साधून शकुंतला देवी यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. या महाप्रसादाचा लाभ परिसरातील भविकांनी घेतला. यावेळी विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने