कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील तितीक्षा कांबळे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत 214 गुण प्राप्त करून समाजाच्या 20 जागांमध्ये गुणवत्ता यादीत 10 वा क्रमांक मिळवला आहे.एमपीएससी अंतर्गत सन 2019 साली पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुख्य परीक्षा पार पडली होती. या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी नुकतीच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द झाली आहे.
येथील शिकलगार वसाहती जवळ महाराष्ट्र शासनाच्या जागेत भुई-भाड्याच्या जागेत राहत असलेल्या कुमारी.तितीक्षा कांबळे हिचे आई-वडील शेतमजुरी करतात.घरची परिस्थिती बेताची असताना कुमारी. कांबळे हिने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत लेखी, शारीरिक चाचणी आणि मुलाखत या तीनही प्रकारात 340 पैकी 214 गुण प्राप्त केले आहेत. स.पो.नी बालाजी भांगे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, किशोर खाडे यांनी कुमारी.कांबळे हिचा सत्कार करून कौतुक केले आहे.