Top News

सर्पमित्र अमर पाटील यांनी पकडला हरणटोळ जातीचा साप

 


सैनिक टाकळी / शिवार न्यूज नेटवर्क :

सैनिक टाकळी येथील सर्पमित्र अमर पाटील यांनी सैनिक टाकळी मधे दुर्मिळ जातीचा हरणटोळ साप पकडला. कुमार कोळी आणि पांडूरंग कोळी यांच्या घराशेजारी आंब्याच्या झाडा वरती हा साप आढळून आला. हरणटोळ झाडांतून वस्ती करणारा साप आहे. हिरव्या रंगाचा हा साप पाने ,झाडावरच राहतो आणि जगतो, नेहमी वेलींवर किंवा फांद्यांवर दिसून येतो, जेथे जंगल घनदाट आणि उष्णता असते तेथे त्याचे वास्तव्य असते. परंतु टाकळी सारख्या नागरी वस्ती मध्ये पहिल्यांदाच दुर्मिळ साप आढळून आला आहे. अमर पाटील यांनी परिसरातील अनेक विषारी व बिनविषारी साप पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडून दिले आहेत. आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना अमर पाटील म्हणाले साप हा शेतकऱ्याचा मित्र असून निसर्गाचा समतोल राहायचा असेल तर भूपृष्ठावरील सर्व सजीव जिवंत राहणे गरजेचे आहे .

थोडे नवीन जरा जुने