कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
दि. ६ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्यमंत्री यांनी बोलाविलेल्या सर्व लोकप्रतिनिधी,आदिवासी जमातीचे प्रतिनिधी,विविध विभागाचे सचिव व अभ्यासू प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीत कोणत्याही प्रकारचे संशोधन नसताना विस्तारीत क्षेत्रातील मूलनिवासी जमातीला आ. किरण लहामटे,आदिवासी आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड व कार्यकर्ता लकी जाधव यांनी सर्वांसमक्ष 'बोगस' बोलून विस्तारीत क्षेत्रातील तमाम आदिवासी बांधवांचा अपमान केला.त्याचा निषेध करण्यासाठी काळया फिती लावून गुरुवार दि.१५ ऑगस्ट२०२४ या स्वातंत्र्यदिनी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे मार्फत मुख्यमंत्री महोदय यांना निषेधपत्र देण्यात येणार आहे. तरी तमाम आदिवासी जमात बांधवानी उपस्थित राहून आपली वज्रमूठ दाखवून अन्यायाचा निषेध करण्याचे आवाहन अध्यक्ष विजयराव भोजे व सहसचिव राजेंद्र कोळी वसगडे यांनी केले आहे.
