Top News

दिव्यांगांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा

 दिव्यांगांना ५ टक्के राखीव निधी द्यावा यासह विविध मागण्याचे घोसरवाड ग्रामपंचायतीला निवेदन



घोसरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

सन २०२३ - २०२४ मधील ५ टक्के दिव्यांग राखीव निधी मिळावा , आर्थिक वर्षानंतरही आगामी वर्षासाठी आकारण्यात आलेली कर वसूलीची रक्कम परत मिळावी, सन २०२० ते आजअखेर दिव्यांगांच्या खर्चाचा तपशील मिळावा या मागणीचे निवेदन घोसरवाड ( ता शिरोळ ) येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने घोसरवाड ग्रामपंचायतीचे सरपंच साहेबराव साबळे व ग्रामसेवक संतोष चव्हाण यांना देण्यात आले.

       दरम्यान , ग्रामसेवक चव्हाण म्हणाले, दिव्यांगाना निधी वाटप करताना विश्वासात घेतले जाते. यापुढेही दिव्यांगांचा निधी वेळेत देणे बाबत प्रयत्नशील राहू . दिव्यांगावर अन्याय होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी विविध विषयावर चर्चा करून

दिव्यांगांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला.

      यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ दगडू माने , घोसरवाड प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या दिपाली मुगळे, तालुका अध्यक्ष सईद पिरजादे , उपाध्यक्ष अनिल देशमुख , बंड़ा परीट , धोंडीराम धुमाळे , राजश्री गवळी , सुनिता पाटिल ,रुपाली भादुले , आदर्श कमते , काशीनाथ मोडके ,इमताज नाईकवाडे , विजय घाट , राजू कांबळे ,महादेव कमते , वृंदा कोळी , सानिका तराळ,

सतोष चौगुले ,यास्मिन चाऊस यांच्यासह उपसरपंच अमोल उर्फ राकेश कागले, मयूर खोत व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

       निवेदनात म्हटले आहे की, घोसरवाड येथील आम्ही दिव्यांग बांधव असुन घोसरवाड ग्रामपंचायतीकडून वाटप केलेल्या मार्चपासून सन २०२३ - २०२४ मधील ५ टक्के दिव्यांग राखीव निधीची मागणी करीत आहेत. अद्याप माहिती देण्यात आलेली नाही . येत्या ८ दिवसात दिव्यागाच्या खात्यावर पाच टक्के राखीव निधी वर्ग करणेत यावा व जमा खर्चाचा तपशील देण्यात यावा .याबाबत ग्रामपंचायतीने दिव्यांगाचे प्रश्न समजून घेऊ तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा दिव्याग ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

थोडे नवीन जरा जुने