Top News

निपाणी येथील हालसिद्धनाथ कारखान्यालां इथेनॉल प्रकल्पातून मिळाली नव संजीवनी : माजी मंत्री,आमदार सौ शशिकला जोल्ले.



अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

          सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ, खास. अण्णासाहेब जोल्ले, आम. शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यात नव्याने स्थापन केलेल्या दीड लाख लिटर दैनंदिन उत्पादन क्षमतेमधून १२ लाख लिटर इथेनॉल भारतीय ऊर्जा कंपन्यांना विकले आहे. गुरूवारी आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते इथेनॉल टँकर चे पूजन करून वाहतूक सुरू करण्यात आले यावेळी बोलतांना. आम. शशिकला जोल्ले म्हणाल्या, की निपाणी भागातील हालसिद्धनाथ हे आपल्या भागातील पवित्र दैवत आहे. या देवाच्या नावाने असलेला कारखाना बंद पडू नये या उद्देशाने शेतकरी व कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने कारखान्याचे नेतृत्व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केले आहे. आमच्या ताब्यात आल्यापासून कारखाना चांगला बदलला आहे. यापुढेही कारखान्याच्या भरभराटीसाठी आपण सर्वांनी मिळून काम करू. या सर्वाच्या सहकार्याने कारखान्यात इथेनॉल घटक निर्माण केला आहे. सध्या इथेनॉल विक्री सुरू झाल्याने कारखान्याच्या उत्पनात मोलाची भर पडेल. तसेच भविष्यात कारखाना आणखीनच प्रगती करेल यांत शंकाच नाही असे जोल्ले यांनी सांगीतले.

           यावेळी बोलताना हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना चे अध्यक्ष एम.पी पाटील म्हणाले, हा प्रकल्प सुरू होण्यासाठी आमचे नेते खास. आण्णासाहेब जोल्ले, आम. सौ शशिकला जोल्ले यांच्यासह कारखान्यातील सर्व घटकांचे सहकार्य लाभले आहे. त्यासाठी सर्व घटकांचे संचालक मंडळाचा कृतज्ञ असल्याचे त्यांनी सांगीतले. 

      यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष पवनकुमार पाटील, संचालक आप्पासाहेब जोल्ले, अविनाश पाटील, जयकुमार खोत, प्रकाश शिंदे, रामगोंडा पाटील, रमेश पाटील, रावसाहेब फराळे, समीत सासणे, शरद जंगटे, सुकुमार पाटील, विनायक पाटील, विश्वनाथ कमते, सुहास गुमणे, गीता पाटील, वैशाली निकाडे, श्रीकांत बन्ने, राजू गुंदेशा, महालिंग कोठीवाले, बाळासाहेब कदम, मल्लगोंडा पाटील, कार्यकारी संचालक शिव कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष सुनिल पाटील, यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने