सैनिक टाकळी / शिवार न्यूज नेटवर्क :
सैनिक टाकळी येथील रेणुका मंदिर चे पुजारी गावकऱ्यांचे श्रद्धास्थान परशराम काटकर ( देवमामा) यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. काल दिनांक ३०/४/२०२४ रोजी यल्लमा देवीचा जागर मोठ्या उत्साहात संपन्न झाला या जागराच्या वेळी देव मामा यांनी हा होत असलेला भंडारखाना हा माझा शेवटचा असल्याचे त्यांनी घोषित केले होते. यापुढील भंडारा गावकऱ्यांनी अत्यंत गुण्यागोविंदाने आनंदाने पार पाडावा अशी त्यांनी संपूर्ण गावकऱ्यांना विनंती केली आणि आज त्यांचे असे आकस्मित निधन झाल्याने संपूर्ण टाकळी परीसरात शोककळा पसरली आहे. अंत्यविधी शुक्रवार दिनांक ३/५/२०२४रोजी सकाळी ७ वाजता होणार आहे.
