कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर येथील भाग्यश्री वधु-वर सूचक केंद्र कोल्हापूर आयोजीत कोळी जमातीचा वधू-वर मेळावा,शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन सौ.हेमलता अरूण कोळी संचालिका भाग्यश्री वधु वर केंद्र कोल्हापूर यानी केले.
महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या सुमारे ८५ वधू - वरांनी नाव नोंदणी केली.उपस्थित वधूवरांनी आपला परिचय व अपेक्षा स्पष्ट केल्या. प्रथमतः आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले . स्वागत व प्रास्ताविक अरुण बाजीराव कोळी बोरपाडळेकर यांनी केले.
कोळी जमातीचे अभ्यासक व सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. मनोहर कोळी यांचा पिंपरी चिंचवड आदिवासी कोळी समाज संघाच्या वतीने अध्यक्ष सुभाष कोळी यांनी मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. कोळी म्हणाले की जमात बांधवांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरूध्द सर्वांनी एकत्र येवून लढा देण्याची गरज स्पष्ट केली.
यावेळी विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या जमात बांधवांचे सत्कार करण्यात आले. यावेळी दिलीप कोळी, गंगावेश,आर.जी.कोळी,रमेश कोळी,हिम्मत कोळी,राजू कोळी,डी.ए.कोळी,दिलीप शिरढोणे,महेश माने,अनिल कोळी,अशोक कोळी,वसंतराव मुळीक अध्यक्ष- मराठा महासंघ(नाना),सुहास पाटील पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते. आभार अमित प्रभाकर कोळी रूकडी यांनी मानले.
