इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व जूनियर कॉलेजमध्ये 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व प्रशालेचे ज्येष्ठ सेवक श्री अशोक नाटकुळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले. सदर प्रसंगी संस्थेचे संचालक संदीप जाधव संचालिका सौ.सुंदरा जोशी मॅडम प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. एम एस रावळ मॅडम व मुख्याध्यापक श्री डी वाय नारायणकर सर यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.एम. एस. रावाळ मॅडम यांनी केले प्रास्ताविकामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास घडवणाऱ्या थोर विभूतींच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख विद्यार्थ्यांना सांगून आपण आपले कर्तृत्वाचे वेरूळ घडवावे तसेच कामगार हा देशाचा विकास करणारा एक महत्त्वाचा घटक आहे त्यांच्याशी सदैव आत्मीयतेने वर्तन करावे. राष्ट्राबद्दल व देशाबद्दलच्या विकासासाठी सतत जागृत रहावे. विद्यार्थी जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे. समस्यांचा वेध घेता आला पाहिजे. प्रगती करण्याचा ध्यास घ्या. विज्ञाननिष्ठ बना व देशाचा एक कर्तव्यनिष्ठ नागरिक बना असे लाखमोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अशोक नाटकुळे यांनी विद्यार्थ्यांना सतत ज्ञानार्जन करत राहून स्वतःचा समाजाचा व देशाचा विकास करावा कामगारांबद्दल कृतज्ञता ठेवावी असं बहुमोल संदेश दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संदीप जाधव साहेब यांनी विद्यार्थ्यांना गुणवंत, ज्ञानवंत, धनवंत बनवून शाळेचे व देशाचे नाव मोठे करा, असे आवाहन करत सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमासाठी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री आर.ए. नायकवडे सर श्री बालाजी विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका निशा कणसे मॅडम श्री बालाजी बाल मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. रंजना घोरपडे मॅडम, इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक श्री मिटके सर, ज्युनिअर कॉलेज सायन्स विभागाचे एच. ओ. डी. प्राध्यापिका सौ रुपाली रिसवडे मॅडम, कॉमर्स विभागाचे एच. ओ. डी. प्राध्यापक कुमार कांबळे सर तसेच वरील सर्व शाखांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्ग व प्रशालेतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुधाकर शिंदे सर यांनी केले.
