हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
सामान्य माणसाला गरिबांना,वंचितांना, शोषीतांना कोट्यावधी देवदेवतांना जे हक्क देण शक्य झाले नाही ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली.अशा या महामानवाची जयंती शिरढोण येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रथम ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच बाबासो हेरवाडे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व उपसरपंच रेश्मा चौधरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानंतर भाजपाचे नेते पोपट पुजारी यांच्या घरी प्रतिमापूजन संपन्न झाले. यावेळी भाजप नेते पोपट पुजारी,तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद कांबळे, ग्रामपंचायत सदस्य ललिता काकी जाधव, किरण कोईक,गितन यादव,विद्यासागर पाटील, अशोक मगदूम,जयपाल माणगावे, विजय सूर्यवंशी, बिरू यंगारे, डॉक्टर कुमार पाटील,सुभाष कोरे, शोभा कोरे आदी मान्यवर उपस्थित होते. माळ भागावर देखील बौद्ध समाजाच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमा पूजन सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
गावभाग येथे बौद्ध समाजाच्या समाजमंदिर येथे मोठ्या उत्साहात जयंतीचा समारंभ संपन्न झाला. इतिहासात प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचा मान यावेळी महिलांच्या कडे देण्यात आलेला होता. महिलांनी जयंती कमिटी स्थापन करून अतिशय नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने जयंतीचा हा मुख्य सोहळा संपन्न केला.सायंकाळी बौद्ध समाजाच्या वतीने डॉ आंबेडकर जयंतीनिमित्त गावातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत बँड, लेझीम पथक, रथ यांचा समावेश होता.तसेच मोठया प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. मिरवणूकीत महिलांची संख्या लक्षणीय होती यावेळी जयंतीची सूत्रे महिलांनी हाती घेतल्याने गेल्या आठ दिवसा पासून होम मिनिस्टर, व्याख्यानमाला, भीम गीतांचा कार्यक्रम,हिप्नॉटिझम, लहान मुलांच्या नृत्य स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धा, आदी विविध कार्यक्रम घेतले.सकाळी ऐतिहासिक भूमी माणगाव येथून आणलेल्या धम्म ज्योतीचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सर्वप्रथम झेंडा वंदन सरपंच बाबासाहेब हेरवाडे यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रतिमा पूजन उपसरपंच रेश्मा चौधरी आणि सर्व सदस्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी वसुंधरा सतीश कबनूरकर,जेष्ठ पत्रकार दिलीप कोळी, स्वाभिमानी चे विश्वास बालीघाटे, सोहेल बाणदार, ज्येष्ठ नेते चंद्रकांत मोरे सर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती कांबळे यांनी तर आभार पोलीस पाटील अनुराधा जाधव यांनी मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रवी कांबळे, शक्ती पाटील,भास्कर कुंभार, नागेश कोळी,रावसाहेब बिरोजे, पत्रकार बिरु व्हस्पटे, विश्वास शिंगे, भाऊ कांबळे, जयंती कमिटी अध्यक्षा रेश्मा कांबळे, उपाध्यक्षा श्रीदेवी कांबळे, सचिव सीमा कांबळे, खजिनदार विमल कांबळे, वेणू कांबळे, सुकन्या कांबळे, नीता शिंगे,संगीता माळकरी, आदी मान्यवर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
