Top News

मुख्यमंत्री व आमदार यड्रावकर यांची बंद खोलीत दोन तास चर्चा

 लोकसभा निवडणुकीची आखली रणनीती 

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर आणि यांची मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास घरी जाऊन भेट घेतली. सुमारे दोन तास बंद खोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात आली '

   लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यांचा कोल्हापूर दौरा संपन्न झाला. महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महायुतीचे उमेदवार आणि सर्वच पदाधिकाऱ्यांच्या बरोबर समन्वय ठेवून प्रचारात सक्रिय व्हावे व नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपली भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी चर्चेत सांगितले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने हे कर्तबदार उमेदवार आहेत. शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना तिकीट मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

 शिरोळ तालुक्यातील सर्वच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन खासदार धैर्यशील माने यांना तालुक्यातून मोठे मताधिक्य देणार असल्याचे आमदार डॉ. यड्रावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ग्वाही दिली. 

  पहाटे तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निवासस्थानी अचानक भेट दिल्यामुळे महायुतीचे सर्वच कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. या भेटीवेळी खासदार धैर्यशील माने, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, आदित्य पाटील यड्रावकर यांच्यासह यड्रावकर गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने