Top News

इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेत देवपुष्प स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

जयपूर (राजस्थान) येथील इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेत हेरवाड येथील देवपुष्प सेमी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या इयत्ता दुसरी आणि तिसरीतील पाच विद्यार्थी सहभागी झाले होते. त्या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

  यामध्ये इयत्ता दुसरी मधील श्लोक देबाजे, आरव‌ मस्के, स्वराज्य चौगुले, इयत्ता तिसरी मधील संस्कार घोलप,

प्रियांका थरकार यांनी यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना मानकापूरचे प्रदीप चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

थोडे नवीन जरा जुने