Top News

सानिका पाटील हिला राष्ट्रीय स्तरावर कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

 सहकारभूषण एस. के. पाटील महाविद्यालय, कुरुंदवाड इयत्ता 12 वी कला शाखेची विद्यार्थिनी कु. सानिका अमर पाटील हिने राष्ट्रीय स्तरावर कुस्ती केंद्रामध्ये रौप्यपदक पटकावून यश संपादन केले आहे.

    दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या 19 वर्षाखालील राष्ट्रीय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत सहकारभूषण एस. के. पाटील ज्युनिअर कॉलेज मधील इयत्ता 12 वी कला शाखेतील कुस्ती मल्ल कु. सानिका अमर पाटील हिने 53 किलो वजनी गटात रौप्यपदक प्राप्त केले या स्पर्धेमध्ये सानिकांने महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते. कु.सानिका अमर पाटील ही साधना कुस्ती केंद्रात सकाळी व सायंकाळी दैनंदिन सराव करत असते. सदर कुस्ती खेळाडूस साधना कुस्ती केंद्राचे मुख्य प्रशिक्षक रमेश कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले तर संस्थेचे अध्यक्ष मा. जयरामबापू पाटील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. एस. कदम उपप्राचार्य व क्रीडा संचालक डॉक्टर सुनील चव्हाण पर्यवेक्षक प्रा. संदीप सावगावे, ज्युनियर क्रीडा विभाग प्रमुख प्रा. संजय पाटील , सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक यांचे प्रोत्साहन लाभले.

थोडे नवीन जरा जुने