Top News

शिरोळ तालुक्याला पावसाने झोडपले ; ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत

 शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

ऐन हिवाळ्यामध्ये शिरोळ तालुक्याला शनिवारी रात्री अवकाळी पावसाने झोडपले. या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सुमारे तासभर पडलेल्या पावसाने पाणीच पाणी करून टाकले होते. सदरचा पाऊस ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरला आहे. 

  सध्या उसाचा हंगाम सुरू असल्याने गेल्या काही दिवसापूर्वी पावसाने अशाच प्रकारे हजेरी लावली होती, त्यामुळे अनेक ठिकाणच्या ऊस तोडी थांबल्या होत्या. अखेर काही दिवसांपूर्वी मळी भागासह पाणलोट क्षेत्रातील ऊस तोडी सुरू होत असतानाच आज शनिवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा अवकाळी पावसाने झोडपल्याने ऊस क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या ऊस तोडी अर्धवट राहिल्या आहेत तर अनेक शेतकऱ्यांच्या ऊस तोडी लांबणीवर पडणार आहेत. त्यामुळे सदरचा पाऊस हा शेतकऱ्यांना मारक ठरला आहे.

थोडे नवीन जरा जुने