सैनिक टाकळी / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल या शाळेचा कोल्हापूर जिल्हास्तरीय 14 वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या आट्यापाट्या संघाने घवकवीत यश संपादन केले. ग्रामीण जिल्हास्तरीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल माले तालुका पन्हाळा या ठिकाणी पार पडल्या. शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी 14 वर्षाखालील मुलांच्या संघाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. शनिवार दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हास्तरीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुलींच्या संघाने न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ या संघाला अंतिम सामन्यात हरवून प्रथम क्रमांक पटकावला. सदर क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील आठ संघानी सहभाग घेतला होता .पहिल्या फेरीत जयवंत हायस्कूल लाटवडे या संघाला पराभूत केले. दुसरा सामना म्हाळसाबाई हायस्कूल बसर्गे तालुका गडहिंग्लज या संघाविरोध दोन शून्य ने विजय मिळवला .तर अंतिम सामन्यात न्यू इंग्लिश स्कूल विरुद्ध तीन विरुद्ध दोन अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. सर्व विजयी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेमार्फत यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
