Top News

हुपरी : श्री दत्त मंदिराचा वास्तुशांती व प्राणप्रतिष्ठा सोहळा

प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क

वाळवेकरनगर हुपरी मधील श्रीदत्त मंदिराचा वास्तूशांती व श्रीदत्त मूर्तीचा प्राणप्रतिष्ठान सोहळा मोठ्या ऊत्साहात संप्पन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आवाडे उपस्थित राहणार आहेत.

 दि: ७ रोजी सकाळी ठिक ८ वाजता श्रीदत्त मूर्तीची व पालखीची सवाद्य भव्य मिरवणूकची सुरुवात मा. आण्णासाहेब शेंंडुुरे व अशोकराव माने यांच्या शुभहस्ते होणार आहे. दि : ८ व ९ रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत वास्तूशांती व होम-हवन चा कार्यक्रम श्रीधर जोशी यळगूूड यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे.

 दि: १० रोजी ठिक १२ : ५० वजता श्रीदत्त मूूर्तीचा प्राणप्रतिष्ठान सोहळा परमपूज्य परत्मराज महाराज श्री क्षेत्र आडी यांच्या अमृत हस्ते संपन्न होणार आहे.

महाआरती राजेश परिवार हुपरी यांच्या हस्ते होणार आहे. आमदार राजूबाबा आवळे यांच्या आमदार फंडातून करण्यात आलेले मंदिराचे सुशोभिकरण यामध्ये मंदिर भोवतीचे कंपाऊंड, मंदिर परिसरातील पेव्हींग ब्लॉक व मंदिर सभोवतालचे भव्यशेड. याचा लोकार्पण आमदार राजूबाबा  

आवळे यांच्या हस्ते होणार आहे.

 दि १२ रोजी सकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

 सदर कार्यक्रमाचा लाभ परिसरातील सर्व भाविक भक्तांनी घ्यावा,असे विनम्र आवाहन ओंकार बालअवदूत दत्त अध्यात्मिक सेवा संस्था वाळवेकरनगर हुपरीचे अध्यक्ष प्रकाश मोरबाळे यानी केले आहे.

थोडे नवीन जरा जुने