कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरढोण (ता. शिरोळ) येथे शेतीच्या शिवेसाठी रोवण्यात आलेली सळी का उपसली असा विचारले असता अमजदअली हनिफ मुल्लाणी याच्यासह घरातील चौघांनी माझ्यासह पतीला दगड, काठी व सळीने बेदम मारहाण करुन जखमी केल्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद रुपाली अनिल पाटील यांनी कुरुंदवाड पोलिसांत दिली आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. या मारहाणीत फिर्यादी रुपाली यांच्या दोन्ही हाताला जबर मारहाण झाली असून त्यांच्यावर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. तर त्यांचे पती अनिल पाटील यांना हाताला व पायाला सळीने व काठीने मारहाण झाली आहे.
या मारहाणप्रकरणी अमजदअली हानिफ मुल्लाणी, बाबासो हानिफ मुल्लाणी, तौसिफ अमजदअली मुल्लाणी, सोहेल अमजदअली मुल्लाणी अशा चौघाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास कुरुंदवाड पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा