Top News

शिरोळ तालुक्यातील राज्य मार्ग रस्त्यांसाठी १० कोटीचा निधी : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : 

दिवाळीपर्यंत राहिलेल्या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील राज्य मार्ग असलेले रस्ते खराब व नादुरुस्त झाले होते, या राज्य मार्ग रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी निधी मिळावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून शासनाकडे आपण मागणी केली होती,

त्याला मान्यता मिळाली असून नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी बजेट मधून शिरोळ तालुक्यातील या खराब झालेल्या राज्य मार्ग रस्त्यांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे,

लवकरच या सर्व रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे सांगताना शिरोळ तालुक्यातील गावागावांमधील विकास कामांसाठी शासनाच्या माध्यमातून यापुढे देखील निधीचा ओघ कायम राहील असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हटले आहे.

थोडे नवीन जरा जुने