शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
फुले-शाहू - आंबेडकर विचार मंच आणि मातोश्री आशाताई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने दत्त पॉलिटेक्निक कॉलेज शिरोळ येथे एक दिवसीय १०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व्याकरण विषयाच्या कार्यशाळेचे उद्घाटन भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर (ग्रामीणचे) जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांच्या हस्ते रोपांना पाणी घालून करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख डी.जी घाडगे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यान केले.
या कार्यक्रमास विचारमंच विश्वस्त अशोक शंकर कांबळे, राजेंद्र प्रधान,सचिन कोरोचीकर, निलेश शिरोळकर, संजय कांबळे, प्रशांत माने, प्रकाश विक्रम कांबळे, भारत ढाले, सच्चोतन बनसोडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन प्राध्यापक विजय शिरोळकर यांनी केले होत.
