जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क
शुक्रवारी रात्री शिरोळ तालुका आणि परिसरात पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा असे आदेश माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रशासनाला दिले आहेत,
शुक्रवारी रात्री संपूर्ण शिरोळ तालुक्यात ढगफुटी सारखा मोठा पाऊस झाला अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले शेती पिकांचे मोठे नुकसान झाले गावागावांचा संपर्क तुटला या घटनेनंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील काही भागाचा दौरा केला व गावागावातील लोकप्रतिनिधींशी संपर्क साधत नुकसानीची माहिती घेतली आणि तातडीने तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, कृषी विभागाचे अधिकारी व गटविकास अधिकारी यांना शिरोळ तालुक्यातील झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले,
अचानक जोरदारपणे आलेल्या या परतीच्या पावसाने शिरोळ तालुक्यातील जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीबरोबरच रस्ते भराव वाहून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे झालेल्या या नुकसानीबाबत पंचनामे करून नुकसानीबाबतचा अहवाल तातडीने राज्य शासनाला देऊन मदत करण्यासंदर्भात शासनाकडे आपण आग्रह धरणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे.
