Top News

श्री.शिव शाहू फाऊंडेशन, शाहूवाडीचे पुरस्कार -शरद सुतार,विनोदकुमार माने, कांचन शिंगे यांना प्रदान

शाहूवाडी / शिवार न्यूज नेटवर्क :

          शाहूवाडी येथील श्री. शिव शाहू फाऊंडेशनमार्फत सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या आदर्श शिक्षकांना जीवनगौरव पुरस्कार तसेच "सुपर थर्टी टीचर्स अॅवार्ड" आज श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांचे शुभहस्ते व माजी आमदार सत्यजित गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली प्रदान करणेत आले.

       कोल्हापूर जिल्हयातील ३० शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करणेत आला आहे. त्यामध्ये शिरोळ तालुक्यातील केंद्रीय शाळा दत्तनगरचे शिक्षक - श्री.शरद बापू सुतार, कुमार विद्यामंदिर टाकळीचे- श्री.विनोद कुमार माने तर कुमार विद्या मंदिर दानोळी नंबर१च्या सौ.कांचन अरुण शिंगे यांचा समावेश आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षक - शिक्षिकांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

              पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी शिवशाहू फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.संजय जगताप सर, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष - रविकुमार पाटील, सरचिटणीस - सुनिल पाटील, शिक्षक बॅंकेचे संचालक सुनिल एडके, शिवाजी रोडे पाटील, हेमंत भालेकर यांच्यासह जिल्हयातील पुरस्कार विजेते शिक्षक, त्यांचे कुटुंबिय, मित्रमंडळी, फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने