Top News

औरवाड येथे स्वाभिमानीने ऊस वाहतूक रोखली



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

औरवाड (ता. शिरोळ) येथील फाट्यवरून सुरु असलेली ऊस वाहतूक  स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरली. अखेर सदरचा ऊस कर्नाटक राज्यातील कारखान्याकडे जात असल्याचे समजताच कार्यकर्ते शांत झाले. दरम्यान यापुढे ऊस दराचा तोडगा निघाल्याशिवाय ऊस वाहतूक केल्यास ट्रॅक्टरची हवा सोडू, असा इशारा स्वाभिमानीचे विश्वास बालिघाटे यांनी दिला.

   ऊसाच्या एफ आर पीची एकरकमी रक्कम व 350 रुपये जादा दर जाहीर केल्याशिवाय ऊस तोडी करु देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी शेट्टी यांनी शनिवारी झालेल्या ऊस परिषदेत दिला होता. त्यामुळे याची कोंडी कोण फोडतात याकडे लक्ष लागून राहिले असताना हेरवाड मध्ये सुरू असलेली ऊसतोड स्वाभिमानीने बंद पाडली यानंतर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे आज स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी औरवाड येथे ऊस वाहतूक रोखून धरली. 

यावेळी बंडू उमडाळे , जयवंत कोल्हे,अमृत अणुजे, कल्लापा चौगुले, अरविंद सूर्यवंशी, बंडू पाटील, वाहन कंत्राटदार समीर पाटील, शीतल बिरनाळे आदी स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने