हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथील ग्रामदैवत श्री संतुबाई देवीच्या यात्रेनिमित्त आज शुक्रवारी दुपारी ३ वाजता भव्य जंगी कुस्त्या होणार आहेत. पहिली कुस्ती महान भारत केसरी पै. शुभम सिदनाळे (दत्तवाड) व मध्यप्रदेश केसरी पै. सुदेश ठाकूर (सांगली) यांच्यामध्ये होणार असून विजयी पैलवानास ५१ हजार रुपये रोख बक्षीस आणि चांदीची गदा देण्यात येणार आहे. याचबरोबर ४५ हून अधिक चटकदार कुस्त्याही होणार आहेत.
यावेळी या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, अनिलराव यादव व सरपंच सुरगोंडा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महापौर केसरी अमृता भोसले, कुस्ती कोच तानाजी डेळेकर, महाराष्ट्र चॅम्पीयन विनोद देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
