Top News

हेरवाड विकास सोसायटीच्या रास्त भाव दुकानास आयएसओ मानांकन

  


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

सहकार क्षेत्रात नांव लौकीक केलेल्या हेरवाड येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या रास्त भाव दुकानास शासनाच्या वतीने आयएसओ मानांकन मिळाले आहे. याचे प्रमाणपत्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

सन १९४९ साली स्थापन झालेल्या हेरवाड विविध कार्यकारी सेवा सोसायटीने सहकार क्षेत्रात आपले नाव लौकिक केले आहे. संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून रास्त भाव दुकान चालवले जाते. या रास्तभाव दुकानातील पारदर्शी कारभार, अखंडित सेवा यामुळेच शासनाच्या वतीने या संस्थेच्या रास्त भाव दुकानाला आयएसओ मिळाले आहे. दरम्यान नुकतेच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते दुकान चालक प्रकाश पाटील यांनी सदरचे प्रमाणपत्र स्वीकारले आहे. यावेळी तहसिलदार अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, प्रकाश पाटील टाकवडेकर यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने