दत्तवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाड येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा -सौ. कविता सचिन पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा-सौ.अर्चना उमाजी चव्हाण,सदस्या-सौ.सारिका संभाजी राणे, सदस्य - श्री.दिलीपकुमार कुरुंदवाडे,श्री. नामदेव चव्हाण, पावडोबा विकास सोसायटीचे चेअरमन श्री पांडुरंग बाबू चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते -श्री. पांडुरंग चव्हाण, मुख्याध्यापक-श्री.दिलीप शिरढोणे, अध्यापिका -सौ. सरिता राजमाने, अंगणवाडीसेविका -सौ. रेखा पांडुरंग चव्हाण,श्रीयश दिलीप चव्हाण,पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
