Top News

"कुमार विद्या मंदिर नवे दानवाडमध्ये शाळापूर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न"

 


नवे दानवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

कुमार विद्या मंदिर नवे दानवाड येथे शाळापूर्वतयारी मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी सरपंच मा.वंदना कांबळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सूर्यकांत बेरड,श्री.एस.ए. अंबुपे, मुख्याध्यापक श्री. मारूती तराळ,अध्यापक, अध्यापिका,अंगणवाडी सेविका,मदतनीस,पालक,विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची विद्यालयातील मुलींच्या झांजपथकाच्या साथीने जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीचे स्वागत पाणी घालून व प्रवेशपात्र मुलांचे सुहासिनींनी औक्षण केले. विद्यालयात आलेनंतर शाळापूर्वतयारीच्या स्टॉलचे उद्‌घाटन सरपंच - मा.वंदना कांबळे यांचे शुभहस्ते संपन्न झाले. प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प व मिठाई देवून करणेतआले. स्वागत- श्री.कुमार सिदनाळे तर प्रास्ताविक केंद्र समन्वयक-श्री.सुभाष कुरुंदवाडे यांनी तर आभार अध्यापिका पुष्पा बाबर यांनी मानले.

     शाळापूर्वतयारी मेळावा संपन्न करणेसाठी श्री.काशीनाथ मोडके,सौ.विद्या सुतार,सौ.कल्पना चौगुले,अंगणवाडी सेविका, मदतनीस,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,पालक, विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले

थोडे नवीन जरा जुने