पुणे / शिवार न्यूज नेटवर्क :
नोकरी म्हणून काम करणं आणि सामाजिक जबाबदारी म्हणून समर्पण भावनेने काम करणं यात फरक आहे. सफाई कामगार, आरोग्य कामगार, अग्निशामक दल, सिक्युरिटी गार्ड, हॉटेलमधील कामगार हे सेवाभावी वृत्तीने आपली जबाबदारी सांभाळत असतात. त्यांच्या समर्पण भावनेचं कौतुक होणं गरजेचं आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेमुळेच आपण आपलं जीवन सहज जगू शकतो असे विचार लेखक, ग्रीन वर्ल्ड क्लबचे संस्थापक अध्यक्ष गौतम कोतवाल यांनी क्लबने आयोजित केलेल्या कामगारांच्या सन्मान सोहळयात व्यक्त केलं.
या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. पूजा चांडक या वेळी म्हणाल्या 1 मे हा कामगार दिन जागतिक पातळीवर कामगारांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. या सर्व व्यक्ती आपल्या सभोवताली काम करत असतात म्हणून आपण सुरक्षित आहोत. क्लबचे संचालक कुमार अन्वेकर याप्रसंगी म्हणाले मानवसेवा हिच इश्वरसेवा आहे. कामगारांचं केलेलं कौतुक इश्वराचं कौतुक करण्यासमान आहे. सिनेअभिनेत्री शितल कारंजे यांनी याप्रसंगी सर्व सन्मानार्थींचं कौतुक केलं.
ग्रीन वर्ल्ड सन्मानाने सन्मानित केलेल्या व्यक्ती सिक्युरीटी गार्ड शिवाकांत तिवारी, अग्निशामक दलाचे दिपक एकबोटे, म.न.पा. कर्मचारी सुप्रिया उंबरकर, सफाई कामगार शोभा सोनवणे, संगिता अडगळे, रानबा पारवे व उषा पारवे, तसेेच शुभम साखरे व सचिन साखरे. कार्यक्रमाचे आयोजन सोनल कोतवाल यांनी केलं होतं. कार्यक्रमासाठी विजय वझे, सौ केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सुत्र संचालन प्राजक्ता नांदगावकर यांनी तर आभारप्रदर्शन बाबू नाईक यांनी केलं.
