Top News

हेरवाडचा क्रांतिकारी निर्णय संपूर्ण महाराष्ट्रभर यशस्वी करू : चंद्रकांतदादा पाटील

 


कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : 

विधवा प्रथा बंदचा ऐतिहासिक निर्णय हेरवाड ग्रामपंचायतीने गाव सभेत घेतल्यामुळे महाराष्ट्रामध्ये हेरवाड हे पुरोगामी विचाराचे गाव निर्माण झालेला आहे. या गावातील महिलांनी पुढाकार घेऊन हा ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल हेरवाड ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व महिला या सर्वांनी चंद्रकांतदादा पाटील यांची आज कोल्हापुरात भेट घेतली. 

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी ग्रामस्थांचे, महिलांचे तोंड भरून कौतुक केले. व अभिनंदन केले. त्यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते महिलांचा व ग्रामस्थांचा या निर्णयाबाबत सत्कार करण्यात आला. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे समन्वयक डॉ. संजयदादा पाटील ॲड. सुशांत संजय पाटील हेरवाड गावचे सरपंच सुरगोंड पाटील व इतर सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. खासकरून यावेळी चर्चेमध्ये डॉ. संजयदादा पाटील यानी बोलताना सांगितले की, हा निर्णय रुजवण्यासाठी आपण सर्व मंडळी मिळून प्रयत्न करूया. यावेळी बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, हा निर्णय महाराष्ट्राला नवी दिशा देणारा आहे, यासाठी लागेल ती मदत भारतीय जनता पार्टी व आम्ही निश्चितपणे करू. हा क्रांतिकारक निर्णय संपूर्ण महाराष्ट्रभर यशस्वी करू, असा विचार यावेळी त्यांनी मांडला.

थोडे नवीन जरा जुने