Top News

अर्जुनवाड येथे धर्मवीर छ. संभाजी महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी

 


राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :

    पराक्रमी, शूर, धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.  छत्रपती संभाजी महाराजांचे वर्णन इतिहासात कधीही पराभव न झालेला योद्धा, शूर, पराक्रमी, स्वराज्यरक्षक, कवी आणि निधड्या छातीचा योद्धा अशी केली जाते. 

   या वेळी माजी सरपंच बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या वेळी हनुमान सेवा सोसायटी चे चेरमन प्रदीप चौगुले सावकर, नंदकुमार पाटील , संभाजी कळणंत्रे, विशाल सूर्यवंशी, प्रवीण गायकवाड,आकाश खोत, संदेश महाडिक, प्रणित वाणी विकास हंबीरव पाटील मास्तर, अनुप पाटील, सागर पाटील, ग्रामपंचायत चे सरपंच स्वाती कोळी उपसरपंच संतोष दुधाळे सहित ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने