कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळांनाही आत्ता वनविभागाकडून नुकसान भरपाई लवकरच मिळणार
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळ्या-मेंढ्यांच्या मालकांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज सादर करून कित्येक महिने झाले तरीही नुकसान भरपाई मिळाली नाही यासाठी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संजय वाघमोडे यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. संघटनेच्या वतीने संजय वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मा.श्री.आर,आर,काळे उपवनसंरक्षक परिक्षेत्र कार्यालय कोल्हापूर यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चाही केली होती. तसेच त्वरित नुकसान भरपाई मिळाली नाही तर कोल्हापूर येथील परिक्षेत्र कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. याची दखल उपवनसंरक्षक श्री काळेसाहेब यांनी घेऊन वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळ्या-मेंढ्यांच्या मालकांनी नुकसान भरपाई मिळाली नाही अशा सर्व शेळ्या मेंढ्या मालकांची नुकसान भरपाईची सर्व प्रकरणे मंजुरीसाठी तात्काळ पाठवावी, असे आदेश कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वनकार्यालयांना देण्यात आले आहेत. या आदेशामुळे आत्ता जिल्ह्यातील मेंढपाळांना ही लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळणार आहे.
शिष्टमंडळा यशवंत क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष मा.श्री.संजय वाघमोडे (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष)मा श्री कैलास काळे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष,मा श्री राहुल पुजारी (कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष), मा श्रीअमोल मेटकर, कागल तालुका अध्यक्ष मा श्री संदिप हजारे, (जिल्हा सरचिटणीस), राम कोळेकर (जिल्हा संघटक), अरुण फोंडे पिंटू गावडे ( शिरोळ तालुका अध्यक्ष), दादासो गावडे(कागल तालुका अध्यक्ष), संदीप हजारे (कागल तालुका उपाध्यक्ष ), सिध्दु दिवटे (करविर तालुका अध्यक्ष ), बाळासाहेब कोळेकर (कोल्हापूर जिल्हा संघटक), अनिल बनकर, सचिन नागरे, हातकणंगले तालुका अध्यक्ष यशवंत वाकसे (राधानगरी तालुका अध्यक्ष) सुनील शेळके (भुदरगड तालुका संपर्क प्रमुख), विठ्ठल येडगे भुदरगड तालुका अध्यक्ष), सगू कात्रूट (भुदरगड राधानगरी तालुका युवक संपर्क प्रमुख ), संदीप झोरे, कागल तालुका संपर्क प्रमुख मा श्री नवल रानगे कागल तालुका प्रसिध्दी प्रमुख), संदीप धनगर (राधानगरी तालुका युवक अध्यक्ष),संतोष लांबोरे निलेश झोरे, बाबू झोरे, महेश झोरे, तानाजी झोरे,राजू झोरे,राम झोरे, प्रकाश झोरे, अक्षय झोरे, गंगाराम गोरडे, आनंदा मेटकर, सुजय गावडे, अनिल सिसाळ, दिवाण गावडे, किरण गावडे, विलास हराळे, मारुती जोंग, संतोष झोरे, विकास झोरे, प्रकाश झोरे, धोंडीराम झोरे, अजय झोरे, भरत झोरे, संजय गावडे, आप्पाजी मेटकर इ. यशवंत क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.