Top News

कुरुंदवाड यात्रेतील उत्कृष्ट नियोजनाबद्दल पोलिसांचा सन्मान


 कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

कुरुंदवाड शहरातील कृष्णा-वेणी यात्रेमध्ये अतिशय उत्कृष्टपणे वाहतुकीचे नियोजन व यात्रेमध्ये बंदोबस्त केल्याबद्दल शहरातील ज्येष्ठ नागरिक व कृती समितीच्या वतीने कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी बोलताना ज्येष्ठ नागरिक अशोक गायकवाड म्हणाले, यात्रेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे व त्यांच्या टीमने रस्त्याच्या दोन्ही साईडला बॅरिकेट्स लावून वाहतुकीचे काटेकोरपणे नियोजन व यात्रेचे बंदोबस्त केले असून पोलिसांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. 

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, किशोरकुमार खाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी रमेश काकडे, बाळासो भोई, बाळासो लाड, परशुराम गायकवाड, प्रकाश कागवाडे, महादेव शिंदे, शंकर मेंगे, डी टी कांबळे यांच्यासह कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीचे राजू आवळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने