Top News

श्री पद्माराजे विद्यालयास राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

श्री पद्माराजे विद्यालयाने शाळा आणि समाज यांच्यात जवळीकतेचे नाते निर्माण केले आहे, कला ,क्रीडा सांस्कृतिक व बौद्धिक गुणवत्ता कौशल्य सिद्ध करताना या हायस्कूलने समाजाप्रती योगदानातून नवी ओळख निर्माण केली आहे, त्यामुळेच समाज भूषण पुरस्काराने विद्यालयाचा गौरव झाला, असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने यांनी व्यक्त केले,

     येथील श्री पद्माराजे विद्यालयास इंडियन टॅलेंट सर्च आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा परीक्षा यांच्यामार्फत राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

यानिमित्त फुले- शाहू आंबेडकर विचार मंच शिरोळ तालुका व माजी विद्यार्थी यांच्या वतीने प्राचार्य सी एस पाटील यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी श्री दगडू माने बोलत होते, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक पै प्रकाश गावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक तुकाराम गंगधर, पर्यवेक्षक एस बी बनकर , कलाशिक्षक पांडुरंग पोळ , अविनाश माने, बी एस गुरव, ए व्ही जाधव, वजीर गवंडी, ए डी पुजारी यांच्यासह यावेळी संभाजी भोसले, नाट्य कलाकार राजेंद्र प्रधान, सामाजिक कार्यकर्ते विजय आरगे, ग्राहक पंचायतचे सुभाष माळी, खंडेराव हेरवाडे, ज्येष्ठ बाळासाहेब माळी आदी मान्यवर व माजी विद्यार्थी शिक्षक वृंद उपस्थित होते, श्रीमती व्ही जे दबडे मॅडम यांनी आभार मानले.

थोडे नवीन जरा जुने