शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
संभाजीपुर येथील हॉटेल पिंगारा शेजारी मोबाईल चोरीचा छडा लावणेस शिरोळ गुन्हे शोध पथकास यश आले असून मिरज जिल्हा सांगली येथील इमदादसाहेब चांद पटेल या संशयीतास ताब्यात घेवून गुन्हयात चोरीस गेलेला ७ हजार रुपये किमतीचा रियलमी सी ११ कंपनीचा मोबाईल जप्त करून संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे. शिरोळ पोलीस ठाण्यात सुलेमान नदाफ नदाफ गल्ली जत ता. जि. सांगली यांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हयाच्या तपासाबाबत पोलीस निरीक्षक डी. एस. बोरीगिड्डे यांनी गुन्हे शोध पथकाकडील अंमलदाराना सुचना देवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत सांगीतले होते. त्याप्रमाणे गुन्हयाबाबत सखोल तपास करुन मोबाईलच्या तांत्रीक माहीतीच्या आधारे सदर गुन्हयातील संशयीत इमदाद साहेबचाँद पटेल व व ३४ रा. हाजी चाँद कॉलनी मिरज ता. मिरज जि. सांगली याचा सदर गुन्हयात सहभाग असलेबाबत गुन्हे शोध पथकाची खात्री झालेने त्याला सापळा रचुन मिरज शास्त्री चौक परीसरातुन शिताफीने ताब्यात घेवून सदर गुन्हयाबाबत त्यांचे कसुन चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली व गुन्हयास चोरीस गेलेला रियलमी कंपनीचा C-11 मोबाईल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई पो.नि. दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. प्रदीप कुंभार, राजाराम पाटील, पो.ना. ताहीर मुल्ला, पोलीस अंमलदार रहेमान शेख, संजय राठोड यांच्या पथकाने केली आहे. दरम्यान, आणखीन काही गुन्हे त्याच्याकडून उघडकीस येतील असा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे.