हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथील क्षारपडमुक्त प्रकल्पाचे संचालक अनिल बाबगोंडा पाटील यांची कु.सानिका हिची महाराष्ट्र पोलिस दलात रत्नागिरी जिल्हयामध्ये निवड झाल्याबद्दल विविध संस्था,मान्यवर,ग्राम पंचायत हेरवाड यांचेवतीने सत्कार करण्यात आला.
दत्त साखर कारखाना शिरोळ च्या वतीने सहकार महर्षि उद्यान पंडीत गणपतराव पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील,संचालक संजय पाटील,रावसो नाईक,दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार,जयसिंगपूर-उदगाव बॅंकेचे संचालक दिलीप पाटील, हेरवाडच्या माजी सरपंच चंद्रकला पाटील,अशोक जलपूरे,रामगोंडा पाटील,प्रदीप पाटील उपस्थित होते.
