प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
दानवाड परिसराच्या विविध भागांमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्याना मोठ्या प्रमाणात आला आहे. जुने दानवाड मधील दुधगंगा नदिच्या ओढ्याच्या शेजारी व गर्दिच्या ठिकाणी मटका जुगार, कल्ल्याण मटका आदी अड्डे खुले आम सुरू आसलेचे चित्र दिसू लागले आहे. या भागामध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या कल्ल्याण मटक्याने पुन्हा डोके वर काढले आहे. अवैध धंद्यावर पोलिसांचा धाकच राहिलेला नाही अशी परिस्थिती या भागामध्ये आहे. टपऱ्यातुन व पत्र्याच्या शेडमध्ये खुलेआम मटका जुगाराच्या चिठ्ठ्या दिल्या जातात. या चिठ्यामधून रोज लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे. या जुगारातुन आणेकजण कंगाल व भिकेला लागले आहेत. आत्तापर्यंत अनेक जणांच्यावर कारवाई करण्यात झाली आहे, तरीही मटका जुगाराचा बाजार सुरूच कसा राहतो ? असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. एसटी स्टँड परिसर, नदी परीसर, गजबजलेल्या ठिकाणी मटका अड्ड्यांचे प्रमुख ठिकाने आहेत,या अवैध धंद्यावर पोलिस कारवाई करणार का ? असा सवाल सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.
