वारणानगर / शिवार न्यूज नेटवर्क :
श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचालित तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा ) येथे राज्यस्तरीय रांगोळी आणि चित्र रेखाटन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली . श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्ष साजरे करत असताना त्याचा यशस्वी आरंभ म्हणून आणि राष्ट्रीय अँटी रॅगिंग व आंतरराष्ट्रीय युवक दिवसाचे औचित्य साधून दि . १२ ऑगस्ट २०२४ रोजी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेच्या निमित्ताने अँटी रॅगिंग व युवकांसाठी विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. अँटी रॅगिंग या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी शासकीय फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र हिरेमठ सर, युवकांसाठी विशेष मार्गदर्शन करण्यास वारणा विद्यापीठाच्या, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. कल्पना पाटील उपस्थित होते.
रांगोळी आणि चित्र रेखाटन स्पर्धेसाठी "स्त्री पुरुष समानता " हा विषय देण्यात आला होता. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : रांगोळी विजेता : कु. समृद्धी धीरज मोरे, सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे
उपविजेता : कु. साक्षी सुरेश कुगे , अनिल इलियास पिंटू मगदूम मेमोरियल कॉलेज ऑफ फार्मसी, धरणगुत्ती, जयसिंगपूर चित्र रेखाटन विजेता : कु. प्रज्ञा सुधीर मेनकुदळे, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसी , आष्टा उपविजेता: कु. गणेश मारुती पाणिरे , तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी,डिप्लोमा, वारणानगर. विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्या करिता श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. विनयरावजी कोरे (सावकर ), डॉ. विलास कार्झींनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, विभागप्रमुख (डिप्लोमा )श्री. रवींद्र पाटील , प्रभारी प्राचार्य (डिग्री ), डॉ. किरण पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक प्रा. नुपूर कुलकर्णी, तसेच सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. वृंदा जाधव यांनी केले.
